Vrihad Vatsayayan Kamasutra
105 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris

Vrihad Vatsayayan Kamasutra , livre ebook

-

Découvre YouScribe en t'inscrivant gratuitement

Je m'inscris
Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus
105 pages
English

Vous pourrez modifier la taille du texte de cet ouvrage

Obtenez un accès à la bibliothèque pour le consulter en ligne
En savoir plus

Description

'Vatsyanas Kamasutra' is based on ancient Hindu erotic science. Anyone who makes use of kamasutra in the life of dharma and artha, without being overwhelmed with passion and attachment attains siddhi or fulfillment in life. The concept of creation being a union of both male and female principles, found its symbolical expression in the dual aspect of related motifs. Thus, we have a very rich and great heritage of erotics in various art forms such as literature, sculpture, painting and music all aiming at nobler, richer and fuller life. A man who is intelligent, learned and prudent, makes use of Kamasutra in the light of dharma and artha, without being overwhelmed with passion and attachment, attains siddhi or fulfillment in life.

Informations

Publié par
Date de parution 01 juin 2020
Nombre de lectures 13
EAN13 9789352785650
Langue English
Poids de l'ouvrage 2 Mo

Informations légales : prix de location à la page 0,0149€. Cette information est donnée uniquement à titre indicatif conformément à la législation en vigueur.

Extrait

महर्षी वात्स्यायन प्राचीन भारतातील कामशास्त्राचे प्रख्यात विद्वान होते. आपल्या रतिशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करून मानव प्राण्याच्या हितासाठी त्यांनी या विषयीचे सर्व ज्ञान आपल्या ‘कामसूत्र’ नावाच्या ग्रंथात संग्रहित केले. एका पिढीनंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, अशा अनेक पिढ्यांनी या ग्रंथाचा फायदा घेऊन आपले जीवन सफल केले आहे. सदर पुस्तकात डॉ. सतीश गोयल यांनी सर्व आवश्यक माहिती अतिशय सोप्य पद्धतीने सामान्य वाचकांच्या हितासाठी सादर केली आहे.
वात्स्यायन
काम - सूत्र
 

 
eISBN: 978-93-5278-565-0
© प्रकाशकाधीन
प्रकाशक डायमंड पॉकेट बुक्स (प्रा.) लि.
X-30 ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-II
नई दिल्ली- 110020
फोन : 011-40712100
ई-मेल : ebooks@dpb.in
वेबसाइट : www.diamondbook.in
संस्करण : 2016
Vatsyayan Kamsutra ( Marathi)
By - Dr. Satish Goyal
अणुक्रमणिका
मनोगत
कामसूत्र उद्देश, उत्पत्ती आणि विकास
कामशास्त्र शिक्षण आणि काम कला
नायिका-नायक प्रकार
स्त्री-पुरूषांच्या जननेंद्रियाचा आकार फरक आणि मैथुन क्रिया भेद
अलिंगन आणि त्याचे प्रकार
चुंबन आणि त्याचे प्रकार
नखक्षत आणि नख विलेखन
दंतक्षत आणि त्याचे प्रकार
संवेशन आणि मैथुनाची विविध आसने
सीत्कार म्हणजेच मैथुनातील प्रहणन आणि सीत्कार
पुरूषायित म्हणजे विरूद्ध रति आणि मैथुनाच्या अन्य पद्धती
औपरिष्टक किंवा मुख-मैथुन
रति क्रिया भेद आणि प्रणय कलह
पत्नीचे मन जिंकणे आणि मैथुन आनंद
रसिक नायक आणि परस्त्री गमन
ओळख आणि प्रेम संबंध
नायिकेच्या मनोभावनेचा अंदाज
राजे आणि राण्यांच्या रंगरलिया
सौंदर्य वर्धन आणि वशीकरण
काम वेग वाढविण्याचे उपाय आणि काम तृप्तीचे विविध प्रयोग
वेश्यावृत्ती
वेश्येची धन लालसा आणि प्रेमाची विरक्ती
पूर्व प्रेमिकाशी पुन: संबंध
वेश्येला होणारे अनेक प्रकारचे लाभ आणि लाभ-हानी व वेश्या भेद
पूर्णाहुती (उपसंहार)
सेक्स : समस्या आणि समाधान
मनोगत
धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुर्घि पुरूषार्थात काम आणि इतर पुरूषार्थ समजले जातात. पुरूषांना हे आवडतात म्हणून त्यांना पुरूषार्थ म्हणतात. ‘धर्म’ विषयक सांगोपांग चर्चा करणारे मनु आणि अत्री यांच्यासारख्या धर्माच्या प्रकांड पंडिताची नावे अतिशय आदराने घेतली जातात. त्यांनी धर्मशास्त्राची रचना केली. प्राचीन आचार्य नंदी, श्वेतकेतु, बाभ्रव्य आणि वात्स्यायन यांनी ‘कामा’ चे वर्णन करण्यासाठी अनेक ‘कामशास्त्रा’ ची रचना केली. या सर्वांमध्ये आचार्य वात्स्यायन यांचे ‘कामसूत्र’ समस्त विद्वान मौलिक आणि प्रामाणिक असल्याचे समजतात आणि त्याकडे आदराने पाहतात.
हे सर्वांनाच माहीत आहे, की जगाचे अदिकारण परब्रह्म परमात्मा आनंदस्वरूप आहे. काम (कामातून मिळणारा आनंद) हे त्याच आनंदमय परमात्म्याचे रूप आहे. भगवान श्रीकृष्णांनीही ‘गीते’ मध्ये स्पष्ट म्हटले आहे, ‘धर्माविरूद्ध: कामोऽस्मि’ म्हणजेच धर्मामध्ये समाविष्ट असलेल कामही मीच आहे.
ऋग्वेदात गृहस्थाश्रमातील कामाचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,
समस्या मा यम्यं काम आगन समाने यौनो सदृशेय्याय ।
जायेव पत्येतन्वं रिरिच्यां वि चिद् वृहेव रथ्येव चक्रा ।।
भावार्थ - माझी ब्रह्मचारिणीची कामना आहे, की मी माझ्यासारख्या ब्रह्मचार्‍याला वरावे आणि त्याच्यासोबत शयन करावे. त्याचा पती म्हणून स्वीकार करून त्याची पत्नी व्हावे. माझे शरीर त्याला अर्पण करावे. आम्ही दोघे रथाच्या दोन चाकांप्रमाणे गृहस्थरूपी रथाला गती मिळवून देऊ.
‘काम’ हा अतिशय पवित्र विषय आहे. गृहस्थाश्रमातील सर्व सुखांचा परमानंद मिळविण्यासाठी कामशास्त्राचा सम्यक अभ्यास सर्व अधिकारी सज्जनांसाठी आवश्यक आहे.
परम पूज्य आचार्य वात्स्यायन यांचे ‘कामशास्त्र’ इतके विशाल आणि सर्वांग संपन्न आहे, की आजही पाश्चात्य विद्वान त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. यामध्ये काही गोष्टी तत्कालिन समाज लक्षात घेऊन लिहिल्या आहेत, पण बाकी बहुतेक गोष्टी शाश्वत सत्य
आहेत, ज्या मानवी समाजासाठी कालातित सिद्ध होतात. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की गृहस्थाश्रमी हेच या शास्त्राच्या अभ्यासाचे अधिकारी आहेत. वात्स्यायनाचे कामसूत्र वाचून तसेच कामजन्य सुखाचे लाभ आणि नुकसान याचा अनुभव घेऊन माणूस निवृत्ती मार्गाचा असा सफल अधिकारी होऊ शकतो, जो कधीही पथभ्रष्ट होणार नाही. आज काल बाजारात कामशास्त्राविषयी जी काही स्वस्त आणि अश्लील तथाकथीत ‘कोकशास्त्र’ उपलब्ध आहे, ते माणसला पथभ्रष्ट तर करतेच, पण सन्मार्गावरही चालू देत नाही. आचार्य वात्स्यायन यांचे कामशास्त्र म्हणजे प्राचीन भारतीय काम कलेचा गौरव ग्रंथ असून कौटुंबिक जीवनात भक्कम पायाचे काम करण्यासाठी समर्थ आहे. जीवनातील महत्त्वाचा भाग असल्यामुळे ‘काम’ ला प्राचीन भारतीय सभ्य समाजात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
‘कामा’ आधुनिक अर्थ प्रेम, यौनसुख, इंद्रियातोष आणि आनंद असे प्रेमाच्या क्षेत्रात येणारे सर्व अनुभव आहेत. आज काल तर इच्छा, संकल्प, कामना, वासना, कामुकता, प्रेम आणि स्नेह हे सर्व मधुर शब्द ‘काम’ या अर्थाचेच द्योतक आहेत.
सदर पुस्ताकाचा मुळाधार आचार्य वात्स्यायनाचे पावन कामसूत्र हेच आहे. भारतीय संस्कृती आणि आधुनिक समज लक्षात घेऊन माझ्या दीर्घ वैद्यकीय अनुभवाचा योग्य प्रकारे लाभ घेत मी या स्वरूपात ‘कामसूत्र ’ सादर केले आहे. काही विषयांना आजच्या परिस्थितीत फारसे महत्त्व द्यायला नको म्हणून मी ते सोडून दिले आहेत. अर्थात तरीही वाचकांपर्यंत मूळ विषय पोहचविण्यात मी संकुचितपणा दाखविला नाही. सर्व मुख्य विषय त्यातील मौलिकतेला बाधा न पोहचविता विस्ताराने समजावून सांगण्याचा मी इथे प्रयत्न केला आहे. माझे प्रयत्न किती यशस्वी झाले आहेत, याचा निर्णय वाचकांनीच घ्यायचा आहे.
काम-सूत्र : उद्देश, उत्पत्ती आणि विकास (Kamsutra-Aim, Origin and Development)
आपले पूण्य ग्रंथ आणि पुराणानुसार ब्रह्माने या विश्वाची निर्मिती केली आणि त्याचा सांभाळ तसेच पालन-पोषणाची व्यवस्था करण्यासाठी एक सहस्त्र अध्यायांमध्ये एका विधानाची रचना केली. त्यानंतर ब्रह्माने असा आदेश दिला की माझ्या या विधानानुसार माझ्या या सृष्टीचा सांभाळ आणि पालन पोषणाची व्यवस्था करायला हवी. त्याचा पूर्ण विकास करा. ब्रह्मजीच्या या आदेशाचे ऋषी-मुनींनी पालन केले.
धर्माची तत्त्वे घेऊन स्वयंभूने मानवजातीला धर्म आणि नीतीवर एक अमर ग्रंथ भेट दिला. अर्थाचा भाग घेऊन बृहस्पतीने ‘अर्थशास्त्रा’ ची रचना केली आणि कामाच्या विषयावर महादेवाचे शिष्य नंदी यांनी काम शास्त्रावर एक सहस्त्र अध्याय असलेले रसप्रधान शास्त्र रचले. या शास्त्राची तपश्चर्या महर्षी उद्दालक याचे पुत्र आचार्य श्वेतकेतू यांनी संक्षिप्त स्वरूपात केली. नंतर पात्रंजाल निवासी बाभ्राव्य याने १५० अध्याय असलेल्या एक सुविहित आणि सुसंग्रहति ग्रंथाची रचना केली. बाभ्राव्यने आपल्या या ग्रंथाला ज्या सात भागात विभाजित केले आहे, ते असे - सामान्य वर्णन म्हणजेच शास्त्र वर्णित विषयाचे सामान्य विवेचन साम्प्रयोगिक म्हणजेच मैथुनासंबंधी प्रतिपादन कन्यासंप्रयुक्तक म्हणजेच विवाहयोग्य कन्येविषयी विवेचन भार्याधिकारक म्हणजे वर-वधुच्या परस्पर व्यवहाराचे वर्णन पारदरिक म्हणजे परस्त्रीविषयक वर्णन. वैशिक म्हणजेच वैश्य व्यवहाराचे वर्णन औपनिषदिक म्हणजे सौंदर्य वर्धनाविषयी
बाभ्राव्यच्या या ग्रंथाचे त्याच्या नंतर आलेल्या विद्वानांनी खूप कौतुक केले. यातील प्रत्येक भागाला विषय बनवून त्यांनी आपल्या स्वतंत्र रचना केल्या. यथा चारायण द्वारा रचित ‘साधारण वर्णन’, सुवर्णनाभद्वारा रचित ‘सांप्रयोगिक’, घोटकमुखाचे ‘कन्यासंप्रयुक्तक’, गोनर्दीय कृत ‘भार्याधिकारिक’, गौणिकापुत्रान लिहिलेले ‘पारदारिक’, दत्तकाचे ‘वैशिक’ आणि कुचमार कृत ‘औपनिषदिक अधिकरण’. या सर्व लेखकांनी आपापल्या योग्यतेनुसार या सर्व ग्रंथाची रचना केली आहे. तरीही काम शास्त्रावर सर्वथा परिपूर्ण आणि सर्वांगसुदंर असा ग्रंथ
कोणी लिहिला नव्हता. परिणामी या शास्त्राचा विकास कमी आणि र्‍हास अधिक झाला. काळाच्या वेगात नंदी, श्वेतकेतु आणि बाभ्राव्य यांचे ग्रंथ विस्मृतीत जाऊ लागले कारण हे सर्व ग्रंथ एक तर एकांगी नाही तर अपूर्ण होते. किंवा अतिशय विस्ताराने लिहिले होते. याशिवाय या ग्रंथांमुळे लोकांची गरजही पूर्ण होत नव्हती. तेव्हा अशा वेळी सर्व ग्रंथातील सारभूत तत्त्वे घेऊन महर्षी वात्स्यायन यांनी सामान्य लोकांसाठी अपूर्व आणि अद्वितीय अशा ‘काम शास्त्र’ या ग्रंथाची निर्मिती केली. तो आजही यौनशास्त्रावरील एक श्रेष्ठ ग्रंत समजला जातो. आचार्य वात्स्यायन यांच्या ‘कामसूत्र’ या ग्रंथात सात विभाग, छत्तीस अध्याय आणि चौसष्ठ प्रकरणे आहेत.
आचार्य वात्स्यायन यांचे असे म्हणणे आहे, की माणूस फक्त संतनोत्पत्तीसाठीच संभोग करीत नाही, तर विषय सुखाचा आनंद मिळविण्यासाठी करतो. इतर प्राणीमात्रांसाठी मैथुन क्रिया फक्त प्रजोत्पदनाचा एक भाग असली, तरीही मानव जातीसाठी त्याचा उपयोग आनंद भोगण्यासाठीही आहे. स्त्री-पुरूषांचे परस्पर संबंध स्थायी असतात, क्षणिक असत नाहीत. इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचा संभोग एखाद्या ऋतूपुरता मर्यादित असत नाही. तर हा संभोग रात्रंदिवस, सर्व ऋतूत आणि सर्व काळी होत असतो. विषय सुखाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी अनेक प्रकारच्या काम प्रक्रियांची आवश्यकता असते. त्यामुळे मैथुनात चरम सीमेचा आनंद मिळविण्यासाठी ‘कामसूत्रा’ चे पठण आवश्यक आहे. कामसूत्र वाचणार्‍या व्यक्तीचे कौटुंबिक जीवन नक्कीच यशस्वी होते.

 
कामशास्त्र शिक्षण आणि काम कला (Kamsutra-The art and Science to be Studied)
प्रत्येक पुरूषाने श्रुती, स्मृती सारख्या धर्मशास्त्रासोबतच कामशास्त्र आणि त्याच्या सहाय्यक शास्त्रांचेही अध्ययन आणि मनन करायला हवे. स्त्रियांनीही या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. खरं तर त्यांनी आपल्या तरूणपणीच एखाद्या कुशल, सक्षम आचार्याकडून कामशास्त्राचे शिक्षण ग्रहण करायला हवे. विवाहनंतर स्त्रीने आपल्या पतीच्या परवानगीनेच हे शिक्षण ग्रहण करायला हवे. वात्स्यायनाचे असे म्हणणे आहे, की स्त्रियांना कामशास्त्रातील सिद्धांताला व्यवहारिक रूप देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे स्त्रियांनी कामशास्त्र आवश्य वाचायला हवे. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की त्यांनी हे शिक्षण विश्वासून आणि योग्य व्यक्तीकडून एकांतात घ्यायला हवे.
कामशास्त्रात प्राविण्य मिळविण्यासाठी मुलींनी एकांतातच चौसष्ट कलांचा अभ्यास करायला हवा. हे शिक्षण त्या खालील व्यक्तीकडून घेऊ शकतात, दाईची मुलगी (जिने पुरूषाशी संभोग केला आहे.) खूप जवळची आणि विश्वासू मैत्रिण आपल्या वयाची मावशी विश्वासपात्र असलेली म्हातारी दासी (सेविका) चांगला परिचय असलेली साधुनी आणि मोठी बहीण, जिला ती मोकळेपणाने आपल्या मनातील गोष्ट सांगू शकेल.
कामशास्त्राबरोबरच स्त्रियांना खालील चौसष्ट कलांचे ज्ञान असणेही आवश्यक आहे, त्या कला अशा आहेत. गायन वादन नृत्य चित्रकला मस्तक शृंगार कला तांदूळ रंगवून रांगोळी काढणे फुलांची शेज करणे शरीर, केस, नखे, दात आणि वस्त्र यांना रंगविण्याची तसेच सजविण्याची कला. रंगीत रत्ने आणि दगडांनी जमिन सजविणे शेज शय्या सजविणे जल क्रीडा करण्याची कला यंत्र, मंत्र, तंत्र आदीची कला फुलाच्या माळा तयार करणे आणि त्याचे दागिने बनविण्याची कला डोक्यात फूल माळा घालणे आणि गजरा बांधण्याची कला वस्त्र, फूलमाळा, दागिने इ. वापरण्याची कला कानात दागिने वापरण्याची कला सुगंधीत द्रव्ये तयार करण्याची कला अनेक प्रकारचे दागिने तयार करून ते वापरण्याची कला विनोद-मनोरंजनासाठी इंद्रजालाची कला वशीकरण इत्यादिची माहिती हात मारण्याची कला अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करण्याची कला अचार, मुरंबे, चटणी, आसव आणि शरबत तयार करण्याची कला, शिवणकाम, वीणकाम करण्याची कला कशिदा काढण्याची कला कोडे घालण्याची आणि सोडविण्याची कला अंताक्षरी खेळण्याची कला गुढ आणि क्लिष्ट शब्दांचे वाक्य तयार करण्याची आणि बोलण्याची कला वेगवेगळे आवाज काढण्याची आणि आवाजाची नक्कल करण्याची कला वेगवेगळ्या आवाजात काव्य आणि इतर ग्रंथ वाचण्याची कल

  • Univers Univers
  • Ebooks Ebooks
  • Livres audio Livres audio
  • Presse Presse
  • Podcasts Podcasts
  • BD BD
  • Documents Documents